अमरावती कर नक्की शेयर करा :- सामान्य माणसाने रेल्वे प्रवास करूच नये अशी व्यवस्था तर तयार होत नाहीये ना?

0
2173
Google search engine
Google search engine

 

मध्य रेल्वेच्या facebook wall वर प्रसिद्ध झालेल्या वरील बातमी नुसार येत्या १६ जुन पासून मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस ह्या गाडीला सध्या असलेल्या आठ sleeper coach पैकी फक्त दोन स्लीपर कोच ठेवून, उरलेले सहा sleeper coach काढुन त्या जागी three tier वातानुकूलित कोच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस ची सध्याची coach arrangment.
1) sleeper class = S1 to S8.
2) three tier a/c = B1 to B9.
3) two tier a/c = A1 to A3.
4) 1st class = H1.
ह्याच गाडीची १६ जुन पासूनची coach arrangement.
1) sleeper class = S1 & S2.
2) three tier a/c = B1 to B15.
Other class arrangement remain unchanged.

तसेच मुंबई – अमरावती एक्स्प्रेस ह्या गाडीला सध्या असलेल्या नऊ स्लीपर कोच पैकी फक्त दोन स्लीपर कोच ठेवून उरलेले सात sleeper coach काढुन त्या जागी three tier वातानुकूलित कोच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

मुंबई – अमरावती एक्सप्रेस ची सध्याची coach arrangement.
1) unreserved coach = 2 + 2.
2) sleeper class = S1 to S9.
3) three tier a/c = B1 to B4.
4) two tier a/c = A1 & A2.
5) composite coach = HA1.
ह्या गाडीची १६ जुन पासून ची coach arrangement.
1) sleeper class = S1 & S2.
2) three tier a/c = B1 to B10.
Other class arrangement remain unchanged.

सध्या चार महीने अगोदर आरक्षण उपलब्ध होत असल्याने रेल्वेने reservation system मध्ये तसा बदल केला आहे.

ह्या दोन्ही गाड्यांच्या स्लीपर क्लासला प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतो. अनेक दिवस अगोदरही आरक्षण मिळत नाही.
शेवट पर्यंत स्लीपर क्लासमध्ये आरक्षण निश्चित होत नसल्याने अमरावती एक्सप्रेस मध्ये तर असंख्य waiting list तिकीट धारक नाईलाजास्तव आरक्षित स्लीपर क्लास मधून प्रवास करत असल्याने ह्यागाडीच्या एका coach मधून दुप्पटी पेक्षा जास्त प्रवासी नेहमी प्रवास करत असल्याचे दिसून येते.
असे असताना ह्या गाड्यांना स्लीपर क्लासचे coach वाढवायचे सोडून, एकाच मार्गावर केवळ तासाभराच्या अंतराने धावणाऱ्या ह्या दोन गाड्यांना असलेल्या स्लीपर कोच पैकी ६ – ७ ( दोन्ही गाड्या मिळून १३ coach ) एवढ्या मोठ्या संख्येने स्लीपर क्लास coach कमी करून त्याजागी three tier a/c coach जोडून सामान्य माणसांची प्रवासाची सोय हीरावून घेवून श्रीमंत वर्गाची सोय रेल्वे मंत्रालय करीत आहे, असे वाटते.

आधीच सर्व सामान्यांच्या पँसेजर गाड्या एक्सप्रेस मध्ये रूपांतरित (convert ) करून प्रवाशांना जादा दराने प्रवास करणे भाग पाडले गेले आहे, सामान्य श्रेणी नसलेल्या, fully air-conditioned with only ac chair car & executive class असलेल्या शताब्दी, तेजस, गतिमान, वंदे भारत सारख्या अनेकानेक गाड्या भारतीय रेल्वेवर नव्याने सुरू केल्या जात आहेत.