संतनगरीत चिमुकली चे मुखोद्गत भव्य महापारायण सोहळा ; मुखोद्गगत व्यासपीठ वाचक अवघ्या सात वर्षाची

0
2191
Google search engine
Google search engine

 

पत्रकार परिषदेत दिली माहिती 

शेगाव ;—- श्रींच्या अद्भुभुत व अलौकिक कृपाप्रसादाने पुलकित असलेली मुखोद्गगत व्यासपीठ वाचक अवघ्या सात वर्षाची कू. सुरभी सुनील ढगे राहणार पिंपरी चिंचवड पुणे, ही चिमुकली संत नगरीत करणार प्रथम त्रिदिवसीय मुखोदगत भव्य पारायण सोहळा येत्या ३०एप्रिल पासुन करणार असल्याची श्री भक्त पारायण सेवा समितीचे प्रमुख, प्रमोद कराळे यांनी कृष्णाजींच्या मळ्यात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. दिनांक 25 एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कृष्णाजींचा मळा येथे पारायण सेवा समिती अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पुढे बोलताना प्रमोद कराळे म्हणाले या चिमुकलीचा दासगणू रचित श्री विजय ग्रंथ संपूर्ण पारायण मुखोद्गगत असून तिने पहिले पूर्ण पारायण शेगावला कृष्णाजींच्या मळ्यात करण्याची इच्छा व्यक्त केली. असता आम्ही सर्व भक्त मंडळी कृष्णाजी पाटलांचे वंशज शैलेंद्र पाटील यांना भेटण्यास आलो व त्या चिमुकलीची इच्छा दादांना सांगितली दादांनीही क्षणाचा ही विलंब न करता जे मागितले ते सर्व देण्याचा आम्हाला होकार दिला व कृष्णाजींच्या मळ्यात 1111 श्री भक्तांचा महापारान सोहळ्याची तयारी सुरू झाली. येणाऱ्या 30 एप्रिलला सकाळी ६.३० वाजता गणेश पूजनाने सुरवात होईल.८.११ वाजता श्री विजय ग्रंथ पारायण सेवा अध्याय १ ते 11 राहील ,सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, व ७ ते ८प्रवचन व रात्री ८ ते ९ विजय ग्रंथावर आधारित गीत गजानन असे कार्यक्रम तीन दिवस दशमी , एकादशी द्वादशीला आयोजित केले आहे. आणि दिनांक २ मे ला संपूर्ण पारायणाची समाप्ती होऊन श्रींचा महाप्रसाद चे वाटप होईल अशी संपूर्ण माहिती कराळे यांनी दिली व विजय ग्रंथ सामूहिक पारायण श्रींना व राष्ट्राला समर्पित असल्याचे ही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत पारायण सेवा समितीचे प्रमुख प्रमोद कराळे अमरावती, एडवोकेट गोपाल बजाज, विलास देशपांडे ,आशिष कराळे ,राजेंद्र बुरघाटे ,विलासराव हिरळकर. शशांक चुंबके व भिडे काका तसेच पांडुरंग ढंगारे अंदूरा, विजय सिघलकार ,विनायक शिंगोलकर, गजानन गावंडे ,आणि खामगाव येथील राजेंद्र जोशी व लताताई जोशी ,अशोकराव आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व श्री भक्तांनी या महापारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान पारायण सेवा समितीकडून करण्यात आले.