अमरावती ब्रेकिंग :- मंडळ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; 20 हजाराच्या लाचेची केली होती मागणी

0
5725
Google search engine
Google search engine

अमरावती :-

तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावावार असलेले सिटीलॅंड येथील दुकान श्री. देवाणी यांना विक्री केले होते.  सदर विक्री व्यवहारात तक्रारदार व श्री. देवाणी यांच्यात वाद झाल्याने विक्री केलेल्या दुकानाची फेरफार नोंद होऊ नये यासाठी लेखी आक्षेप अर्ज घेऊन तक्रारदार नांदगाव मंडळ, तहसील कार्यालय अमरावती येथील मंडळ अधिकारी श्री. विशाल धोटे यांच्याकडे दि १२/०७/२०२३ रोजी गेले असता, मंडळ अधिकारी श्री धोटे यांनी श्री. देवाणी यांचा फेरफार अर्ज आल्यास त्याची फेरफार नोंद न घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांना २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली.  सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि १२/०७/२०२३ रोजी लाच लुचपत विभागाने पडताळणी कारवाई केली असता पडताळणी कारवाई दरम्यान तडजोडीअंती आलोसे विशाल धोटे यांनी तक्रारदार यांच्याकडुन पंचासमक्ष १०,०००/- रुपये लाच मागणी करुन लाच स्वकारण्याची तयारी दर्शवल्याने आयोजित सापळा कारवाई दरम्यान श्री धोटे यांनी पंचासमक्ष १०,०००/- रुपये स्विकारल्याने त्यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून त्यावरून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई
मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र,
१)श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
२) श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,  यांचा मार्गदर्शनात  श्री सतिश उमरे, पोलीस निरीक्षक, केतन मांजरे, पोलिस निरीक्षक, पोशि- शैलेश कडु
पोशि – आशिष जांभोळे पोना – नीतेश राठोड
ला.प्र.वी.अमरावती. यांनी केली आहे