वन मिशन महिला मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसा

0
66
Google search engine
Google search engine

*बुलढाणा लोकसभा परिवर्तन सभे निमित्य संग्रामपूर येथे महिला मेळावा संपन्न..वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिलांच्या विकासाचा संकल्प…वन मिशन महिला मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसाद. मेळाव्याला संबोधित करताना महिलांना आले गहिवरून…

शेगांव:- उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टीकोनासाठी ओळखले जाणारे ‘वन बुलढाणा मिशन’चे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपूर शहारातुन निघालेली परिवर्तन रथयात्रा २२ फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष अन परिवर्तनाचा जागर करणार आहे. या चार दिवसांत तब्बल ७० गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहचत आहे.
..जनतेशी संवाद साधून संदिप शेळके या आदिवासी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेत असतांना त्यांच्या समस्येबद्दल बोलत असताना कित्येक महिलांच्या भावना ह्या भारावून व गहिवरून आल्याचे चित्र संग्रामपूर येथील महिला मेळाव्यात दिसून आले आहे .संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त गावात पोहचले होते. त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व इतर साहित्य सुद्धा वाटप केले होते….वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा संदीप शेळके यांचा निर्धार असून आगामी लोकसभेच्या निवडणूक निमित्ताने त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे….l