रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराला आजपासून आरंभ

0
1004
Google search engine
Google search engine

रामनाथी (गोवा) –

 

 

येथील सनातन आश्रमात २९ जुलैपासून स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) शिबिराला आरंभ होत आहे. हे शिबिर ५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या शिबिरात १० देशांतील ३० साधक सहभागी होणार आहेत. यांमध्ये कॅनडा, भारत, इंडोनेशिया, इजिप्त, फ्रान्स, रुमानिया, सिंगापूर, अमेरिका, मेक्सिको आदी देशांतील साधकांचा समावेश आहे.  या शिबिराचा मुख्य उद्देश व्यष्टी साधना वृद्धींगत कशी करावी, तसेच दायित्व घेऊन समष्टी साधना कशी करावी, हे शिकवले जाईल. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी विविध उपाययोजना सांगणे, समष्टी साधनेतील विविध पैलू समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे, यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विदेशात प्रसार करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या हाताळण्याविषयी, तसेच समष्टी साधनेची फलनिष्पत्ती वाढवण्याविषयीही शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.