*अजिंठा लेणीतील कलाकृती पाहुन श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे भारावले*

0
653
Google search engine
Google search engine

औरंगाबाद :-

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला आज श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी भेट दिली. लेणीतील कलाकृती पाहुन त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच लेण्यांतील कलाकृती पाहुन ते भारावले.
श्री.राजपक्षे यांच्या समवेत पेरिस पर्सी लक्ष्मण, भन्ते प्रशीलरत्न, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक दिलीपकुमार खमरी, उपअधीक्षक श्रीकांत वाजपेयी, वरिष्ठ सरंक्षण सहायक डी.एस.दानवे, पर्यटन अधिकारी विजय जाधव यांची उपस्थिती होती.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या श्रीलंकेतील सीग्रीआ येथील पेंटिंग्स अजिंठा लेणीपासून प्रेरित होऊन रेखाटण्यात आल्याची माहिती श्री. जैस्वाल यांनी दिली. यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करून समाधान मानले. अजिंठा लेणी जागतिक वारसास्थळ खूप प्रेरणादायी असल्याचे सांगत बारकाईने लेण्यांचे निरीक्षण करून लेणीतील बारकावे श्री. राजपक्षे यांनी जाणून घेतले. पर्यटक गाईड सांडू आनंद पाटील आणि सारंग देशमुख यांनी त्यांना ऐतिहासिक अशा बौद्ध लेण्यांची इतंभूत माहिती दिली. तत्पूर्वी अजिंठा लेणी व्हीव्यू पॉईंट येथून लेणीचे विहंगम दृश्य श्री. राजपक्षे यांनी पाहिले व आनंद व्यक्त केला. यावेळी लेणीबाबत श्री. जैस्वाल यांनी माहिती दिली.
सुरुवातीला श्री. खमरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन स्वागत केले. लेणीला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी श्री. राजपक्षे यांच्यासह सेल्फी छायाचित्र घेऊन त्यांचे धन्यवाद मानून स्वागत देखील केले. श्री. राजपक्षे यांनीही पर्यटकांशी हस्तांदोलन केले. त्यामुळे उपस्थित पर्यटकांमध्ये उत्साह आला.