राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

500
मुंबई  – राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. बी. सी. गुप्ता व डॉ. एस. एम. कंटीकर यांनी आज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांची  मंत्रालयीन दालनात भेट घेतली.
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाच्या सर्किट बेंचचे कामकाज दि. 10 नोव्हेंबरपर्यंत राज्य ग्राहक आयोगमुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या कालावधीत 176 प्रकरणे बेंच समोर सादर करण्यात येणार आहेत.
ग्राहक संरक्षणाशी संबंधित एक कोटी रुपयांवरील दावे राष्ट्रीय आयोगापुढे सादर होतात. या कारणास्तव ग्राहकांना दिल्ली येथे जावे लागते. राष्ट्रीय आयोगाचे सदस्य मुंबईत येऊन सुनावणी घेतल्याने लोकांचा दिल्ली येथे जाण्या येण्याचा त्रास आणि खर्च वाचणार आहे.
            डॉ. गुप्ता हे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सेवानिवृत्त सचिव असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अन्न सुरक्षा कायदा २०१३ राबविण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेवर अध्यक्ष म्हणून २०१२ मध्ये काम केले आहे. डॉ. एस. एम. कंटीकर हे एम. डी. पॅथॉलॉजीएलएलबी आणि विधी व वैद्यकीय विषयातील उच्च शिक्षित आहेत. वैद्यकीय निष्काळजीपणावैद्यकीय उपचाराचा हक्क अशा प्रकरणांविषयी डॉ. कंटीकर यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.