२९ मार्चला बीड मध्ये पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन

0
677
Google search engine
Google search engine
२९ मार्चला बीड मध्ये पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन
बीड: प्रतिनिधी
दिपक गित्ते
दि २१  बीड जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालयाची देणगी मिळाली आहे. या कार्यालयाचा शुभारंभ २९ मार्च ला शहरातील बशीरगंज परिसरातील पोस्ट ऑफिस मध्ये सुरुवात होईल.
पासपोर्ट प्राप्त करण्यासाठी बीडकरांना मुंबई, पुणे येथील कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असत बीडकरांची गरज लक्षात घेत आपल्या जिल्ह्याच्या दबंग खासदार सौ. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी संसदेत बीड मध्ये पासपोर्ट कार्यालाय सुरू करण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी दिली आहे. खा. प्रीतमताईंचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तत्पूर्वी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी बीड येथील पोस्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे . सूत्रांच्या महितीनुसारब२९ मार्च ला पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते होईल.