कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक पुस्तके खरेदीसाठी ७२ हजार रुपये मंजूर ४३ कामगार पाल्यांना लाभ

0
771
Google search engine
Google search engine

कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक पुस्तके खरेदीसाठी ७२ हजार रुपये मंजूर

४३ कामगार पाल्यांना लाभ ,परळी कामगार कल्याण केंद्राचा उपक्रम 

बीड:परळी वैजनाथ
नितीन ढाकणे

येथील कामगार कल्याण केंद्राने चालू वर्षासाठी परळीतील ४३ कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत शैक्षणिक पुस्तके खरेदी करण्यासाठी ७२ हजार ९१६ रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
कामगार कल्याण केंद्राच्या पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. यात बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, पॉलीटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. यामध्ये बारावीच्या ५ विद्यार्थ्यांना १ हजार ८६९ रुपये, पदवीधर ९ विद्यार्थ्यांना ११ हजार ९६७ रुपये, पदव्युत्तर पदवीच्या २ विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये, पॉलिटेक्निकच्या ५ विद्यार्थ्यांना ९ हजार ७०५ रुपये, अभियांत्रिकीच्या १८ विद्यार्थ्यांना ४० हजार १२५ रुपये तर एमबीबीएस व बीफार्मच्या ४ विद्यार्थ्यांना ६ हजार २५० रुपये अर्थसाहाय्य देण्यात आले. एसटी महामंडळ, साखर कारखाने, बँका, ऑईल मिल, वीज कंपनी, जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना पाठ्यपुस्तक खरेदीसाठी ही मदत करण्यात आली आहे. लाभार्थी कामगार पाल्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर मंजूर रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान लातूर गटांतर्गत चालणाऱ्या ८ कामगार केंद्रातील ९५ आणि परळीतील ४३ असे १३८ कामगार पाल्यांना १ लाख ९९ हजार ४०४ रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच कामगार कल्याण केंद्रातर्फे कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती योजना व परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते. याचा लाभही कामगारांनी घ्यावा असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले.