मेस्मा कायदा रद्द ,परळीत अंगणवाडी सेविकांचा जल्लोष साजरा 

0
875
Google search engine
Google search engine

 

मेस्मा कायदा रद्द ,परळीत अंगणवाडी सेविकांचा जल्लोष साजरा 

बीड ;

नितीन ढाकणे,दिपक गित्ते 

:अंगणवाडी सेविकांना लागू केलेला जुलमी मेस्मा कायदा सरकारने अखेर रद्द केला. मेस्मा रद्दचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत परळीत अंगणवाडी सेविकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा  केला. त्याप्रमाणेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला झुकावे  लागले. त्यामुळे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व विधान परिषद  विरोधीपक्ष नेते  धनंजय मुंडे यांचे आभार मानले. मेस्मा रद्द करावा यासाठी चार दिवस हा विषय सभागृहात लावून धरण्यात आला होता.

विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानेच सरकारला हा मेस्मा रद्द करावा लागला. महिला व बालकल्याण मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी याबाबत मेस्मा आवश्यकच असल्याची भुमिका घेतली होती. परंतु विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला झुकावे लागले व मेस्मा रद्दचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे आंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आंगणवाडी सेविका -कर्मचारी संघटनेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या वतीने न.प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, शिवसेनेचे नरहरी सुरवसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे म्हणून  प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षा रजनी मोहोड, प्रतिभा गायकवाड, शुभांगी देशमुख, शिवकांता चाटे, शुभांगी चाटे यांच्याा सह शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस  मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.