अशोक मुंडे यांची जिल्हा जलसाक्षरता समितीवर जलप्रेमी म्हणून निवड.

0
914
Google search engine
Google search engine

अशोक मुंडे यांची जिल्हा जलसाक्षरता समितीवर जलप्रेमी म्हणून निवड.

बीड: नितीन ढाकणे

दि.26 संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मुंडे यांची महराष्ट्र शासनाने बीड जिल्हा जलसाक्षरता समितीवर जलप्रेमी म्हणुन नुकतीच निवड केली आहे.

विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी बीड,लातूर,ऊस्मानाबाद, जालना,परभणी,नांदेड,हिंगोली या जिल्ह्यातील जलसाक्षरता कार्यक्रमांतर्गत दि.16फेब्रुवारी2018 रोजी झालेल्या बैठकीत जलप्रेमी (जिल्हास्तर) यांच्या अंतींम निवड यादिस मान्यता दिली. परळीतून अशोक मुंडे, माजलगावमधून रमेश कुटे ,जयदीप कुंभार, बीडमधून भास्कर मुंडे यांच्यासह एकूण 11 जणांची निवड केली आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व  गाळयुक्त शिवार या अभियानानंतर आता जल साक्षरता कार्यक्रमातून मृद्ध व जलसंधारण या विषयावर नागरिक व प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे. यासाठी विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यत येणार आहे मराठवाड्यातील नव्यानेच निवड करण्यात आलेल्या सर्व जलप्रेमींंसाठी विभागीय जलसाक्षरता केंद्र,वाल्मि

, औरंगाबाद येथे 26 ते 28 मार्च 2018 दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यात  पाण्याशी संबधित विविध विषय तज्ञांनी मार्गदर्शनकेले.