वसंत मुंडेंच्या ‘खुली चर्चा’ ची राज्यभर चर्चा- देवेंद्र भुजबळ

0
773
Google search engine
Google search engine

वसंत मुंडेंच्या ‘खुली चर्चा’ ची राज्यभर चर्चा- देवेंद्र भुजबळ

बीड: नितीन एस ढाकणे

विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या माध्यमातून अभ्यासू आणि धडाडीचे नेतृत्व या समितीला मिळाले. मुंडे यांनी सुरुवातीपासुन अधिस्वीकृती समिती आणि पत्रकारांची ‘खुली चर्चा’ हा राज्यात पहिल्यांदाच उपक्रम सुरू केला. यामुळे पत्रकारांच्या सुचना समितीसमोर आल्याने अनेक सकारात्मक बदल होऊन गाव पातळीपर्यंतच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच पत्रकारांमध्ये जागृती होण्यास मदत झाली. त्यामुळे वसंत मुंडे यांच्या या ‘खुली चर्चा’ या उपक्रमाची राज्य समितीतही चर्चा होते अशा शब्दात माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी कौतुक केले