सुसंस्कृत व एकत्र कुटुंबाच्या पुरस्कर्त्या !!स्व.सरोजिनी काकी

0
1304
Google search engine
Google search engine

कडेपुर येथील यादव देशमुख कुटुंबियातील एक महीला पर्व म्हणजे सरोजिनी देशमुख उर्फ आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या लाडक्या काकी!!१५ जुन रोजी निधन झाले त्या निमित्त.

सांगली/कडेगांव/.हेमंत व्यास.-

स्व.व्यंकटराव देशमुख यांना दोन मुले एक संपतराव आण्णा व दुसरे सयाजीराव देशमुख यातील वयाने मोठे होते ते संपतराव आण्णा.आण्णा शिक्षण घेत होते.घरच्या अडचणी मुले सयाजीराव आबांचे लग्न अण्णांच्या अगोदर झाले.पैपाहुण्यातील मुलगी म्हणुन जेष्ठ लोक सांगत आहेत म्हणुन आण्णांनी सरोजिनी काकी यांना पाहण्याचा कार्यक्रमही न करता थेट लग्नालाच उभे राहिले.सरोजिनी देशमुख या अथणी तालुक्यातील लोकुर येथील इनामदार घराण्यातील पांडुरंग बापुसाहेब सुर्यवंशी यांच्या कन्या त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले.वडील पोलीस खात्यात नोकरीस होते.त्यामुले सरोजिनी काकींच्या घरातील वातावरण शिस्तबध्द व सुसंस्कृत सुशिक्षीत घरंदाज घराणे होते.उच्चशिक्षण घेतलेल्या ध्येयवादी संपतराव देशमुख आण्णांशी त्यांचा विवाह ३१ मे १९६६ रोजी झाला.लग्नानंतर खेडे असणारे कडेपुर व शेतकरी कुटुंबियांशी त्यांनी अगदी जुलवुन घेतले.संपतराव आण्णा वकील व्यवसाय करीत होते.परंतु लोकांच्या अग्रहास्तव अण्णांचा राजकारणाकडे ओढा वाढला त्यामुळे वकील व्यवसाय व राजकारण अशा दुहेरी कामामुळे आण्णांच्याकडे लोकांची वर्दळ वाढत होती.सकाली ७ वा.पासुन ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ७वा.पासुन ते रात्री १२वाजेपर्यंत आण्णांच्याकडे विविध कामांच्या साठी, समस्या साठी लोकांची कायम वर्दल होत असे.या सर्व लोकांचे चहापान व सायंकाळी उशीरा आलेल्या लोकांना जेवणाची व्यवस्था करून चर्या लोकांना घरी पाठविले जात असे.

राजकारणात संपतराव आण्णांचा ओढा वाढल्याने व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यात ते व्यस्त असल्याने बाहेर फिरतीवरच जास्त असायचे.आण्णा कडेगांवचा पुर्वीचा तालुका खानापुर होता.खनापुर तालुक्याचे ते सभापती होते.पहिल्यांदाच सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले.जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती झाले.सभापती झाल्यानंतर आण्णांनी वकील व्यवसाय बंद केला.व राजकारणात जादा वेळ दिला त्यामुळे घराकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही.घराण्यातील १००एकर शेतीचा व्याप त्यांचे बंधु सयाजीराव आबांच्याकडे व कार्यकर्ते व पैपाहुणे यांची उठाठेव मात्र सरोजिनी काकी व पृथ्वीराज बाबांची आई देवयानी यांनी नेटाने सांभाळली.आण्णांना हाॅटेलचे जेवण अजिबात आवडत नसे, पैसे चैनी साठी खर्च करणे आवडत नव्हते.त्यामुले आण्णा बाहेरगावी जातांना स्वत: चे व कार्यकर्त्यांचे जेवण बरोबर घरातुन बांधुन घेत होते.बाहेरगांवाहुन येण्यास उशीर झाला तर कार्यकर्त्यांना आपल्या घरी जेवण झाल्यावर त्या कार्यकर्त्यांना स्वत:चर्या जिपने घरी पोहच करायचे.कार्यकर्त्यांना घरची शिदोरी देण्याचे काम मात्र स्वत: स्व.सरोजिनी काकी व पृथ्वीराज बाबांच्या आई देवयानी यांनी कधीही आलस न करता रागराग न करता चहापान व जेवणाची कमतरता कधी कमी पडु दिली नाही.
सरोजिनी काकी शिक्षणाबाबत नेहमी आग्रही असायच्या त्यांना जयदिप व संग्रामसिंह व ही दोन मुले व मुलगी मनिषा,माजी आमदार पृथ्वीराज बाबा व सतिश हे दोन पुतणे व माधवी ही एक पुतणी अशी दोघांना सहा मुले अशी दोघांना सहा मुले या सर्वांची शिक्षणाची जबाबदारी काकींनी समर्थपणे यशस्वी पेलली.आपल्या घरातील सर्वांना पदविधर केले.त्यांचे दोन भाऊ ही विभागीय पोलिस अधिकारी म्हणुन सेवानिवृत्त झालेआहेत.सरोजिनी काकी ह्या एकत्र कुटुंब पद्धती च्या त्या मोठ्या पुरस्कर्त्या होत्या.काकींचे वैशिष्ट्य म्हणजे देशमुख कुटुंबीयाच्या चालीस वर्षाच्या राजकीय जिवनात त्या कधीही कार्यक्रमाच्या ठिकाणी अथवा व्यासपिठावर कोणीही पाहीले नाही.मात्र कार्यकर्त्यांच्या घरी बारसे असो किंवा लग्न सोहळा असो अथवा दुःखद प्रसंग असो स्व.सरोजिनी काकी व देवयानी काकी या दोघीही एकाच गाडीतून येणार व लोकांच्या सुख, दुःखात सामिल होणार.आपल्या दोन्ही मुलांपेक्षा जयदिप, संग्रामसिंह पुतण्या सतिश भाऊ यांच्यावर विशेष जिव्हाळा होता.
जावाजाव की बहिणीबहिणी.
स्व. सरोजिनी काकी व पृथ्वीराज बाबांच्या आई देवयानी ह्या दोघी सख्या जावा.नात्याने कोण मोठे कोण लहान हे न सांगता येणारे कोडे मात्र या दोघीही घरात असो अथवा बाहेर असो बरोबरच असणारच एक आली एक नाही असे कधीही घडले नाही.पंचायत समिती, जिल्हापरिषदेची सभापती पदे भुषविल्यानंतर आण्णांनी आमदार होण्याचे स्वप्न बघितले व झालेही.कडेगांव दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे.यासाठी आमदारकी पणाला लावायची असे आण्णा त्यांचे गुरूजी स्व.गुलाबराव देशमुख दादा यांना ते नेहमी म्हणायचे, गावोगावी पारावर मुले रिकामी बसलेली त्यांना आवडत नसे काहीतरी करून त्यांच्या हाताला काम देवु या असे अण्णांचे स्वप्न होते.त्यामुले पृथ्वीराज बाबा उभा करीत असलेल्या सुत गिरणी, साखर कारखाना प्रस्तावास त्यांनी पाठिंबा दिला.दुर्दैवाने १६ मे १९९७ रोजी आमदार संपतराव देशमुख अण्णांचे दुःखद निधन झाले.आण्णांच्या निधनाने कुटुंबियांचा आधारवडच कोसळला बंधु सयाजीराव आबा, देवयानी काकी,सरोजिनी काकी यांनी कुटुंबियांना सावरण्याचे काम केले.आण्णांच्या निधनाच्या पश्चातही त्या २१ वर्ष आपल्या कुटुंबियांसोबत व कार्यकर्त्यांच्या मागे मोठ्या धीराने व हिंमतीने उभरत्या राहील्या.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबातील एका महीला शक्तीच पर्व अनंतात विलीन झाले असेच म्हणावे लागेल.!!त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच डोंगराई चरणी प्रार्थना!!

शब्दांकन: हिराजी देशमुख.अध्यक्ष कडेगांव तालुका पत्रकार कृती समिती.