“क्रांती सहकारी साखर कारखान्यामार्फत अनुदानावर ताग/धैंचा वितरण”

0
1080
Google search engine
Google search engine

मोहीते वडगांव/कडेगांव/ हेमंत व्यास:

क्रांतीअग्रणी डाॅ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊसविकास योजनेतून ताग धैंचा चे बियाणे वितरणाचा शुभारंभ आज येेथे करणेत आला.
या निमित्ताने येथील शेतकरी श्री बबन पांडुरंग क्षीरसागर याना श्री दत्तात्रय आकाराम मोहिते (माजी संचालक क्रांती साखर )यांचे हस्ते ताग बियाणे वितरीत करणेत आले..कारखान्यामार्फत एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी दरवर्षी अनेक योजना राबविल्या जातात.यामध्ये ऊस लागवडीसाठी लागणा-या सर्व सुविधा व. रोख रकमेचे अर्थसहाय्य याचा समावेश असताे.कार्यक्षेत्रातील जमिनिची सुपिकता वाढविणेसाठी विशेष प्रयत्न केले जातात.प्रेसमड कंपोष्ट खत,गांडूळ खत, जिवाणू खत,याचा दरवर्षी पुरवठा केला जातो.जमिन सुपिकता वाढविणेसाठी हिरवळीच्या खतासाठी ताग/धैंचा चे पिक घेऊन जमिनित गाडणे हा

शेतक-यांसाठी अंत्यंत कमी खर्चाचा व सोपा पर्याय आहे पण
ताग/धैंचाचे दर अलिकडे दुपटीने वाढले आहेत त्यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात.क्रांती नेेे
याबाबत शेतकरी अडचण दूर करणेसाठी ५० टक्के अनुदानावर ताग/धैंचा बियाणे पुरवठा करणेसाठी पुढाकार घेतला आहे.हे बियाणे आणणेसाठी शेतक-याना हेलपाटे मारावे लागू नये म्हणून कारखाना मागणीप्रमाणे गट पोच करत आहे.ऊस लागवडी्अगोदर हिरवळीचे खत केलेमुळे ७/८ टन सेंद्रीय खत मिळते,जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते,सेंद्रीय कर्ब वाढते,त्यामुळे ऊसामध्ये अधिकाधिक शेतक-यानी हिरवळीच्या खताचा वापर करावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अरूणअण्णा लाड यानी केले आहे..
यावेळी प्रगतशील शेतकरी शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष मोहिते,हणमंत मोहिते,आनंदा मोहिते ,मोहन मोहिते,अशोक मोहिते,चंद्रकांत मोहिते,जयवंत मोहिते , ऊसविकास अधिकारी विलास जाधव अॅग्री.आेव्हरसियर अजय पाटील,कृषी सेवक आंनदा जाधव,प्रकाश पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.