सामाजिक कार्यातून आनंद मिळतो : श्री शिंदे

0
1263
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी , पुणे

समाज बदलण्यासाठी स्त:चा दृष्टीनकोन बदलणे गरजेचे अआहे. सामाजिक कार्यातून आनंद आणि प्रेरणा मिळते. निस्वार्थी व प्रामाणिक कार्यास समाजाचा पाठींबा मिळतो. वारकऱ्यांच्या सेवेतून समाजाचे आणि आई वडिलांचे ऋण फेडण्याची संधी मिळते , असे प्रतीपादन नागरी संरक्षण दलाचे अधिकारी आनंद शिंदे यांनी केले.

     संत ज्ञानेश्वर महाराज व  जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी दोन दिवसांच्या पुणे मुक्क्कामात होती. यावेळी आपणही समाजाचे काही देणे लागतो , वारकऱ्यांची सेवा केल्याने साक्षात श्री विठ्ठलाचे दर्शन होते अशी आशा बाळगून हडपसर मधील वाडकर मळा भागातील हिल व्हू सोसायटीने वारकऱ्यांसाठी आपल्या सोसायटीत वारकऱ्यांसाठी स्वच्छ ठिकाणी राहण्याची ,  स्वच्छ बाथरूम आणि टॉयलेट ची सोय केली होती.  याप्रसंगी वारकारी आपल्या सोसायटीत राहायला आल्याने साक्षात परमेश्वरच आपल्या कडे आपला अशी भावना सोसायटीतील सर्व लोकांची झाली. सोसायटीत सगळीकडे आनंदी आनंद होता , प्रत्येक जन वारकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करत होता. त्यांना काय हवे काय नको हे पाहत होते. विठ्ठलनामाच्या  जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

  याप्रसंगी बोलताना सोसायटीचे चेअरमन  डॉ.वेदकुमार कानडे म्हणाले, दूरदृष्टी व प्रेरणा महत्वाची आहे.सामजिक कार्यासाठी लोकांना प्रेरित करणे महत्वाचे असते. याप्रसंगी कानडे, आनंद शिंदे, गौतम कांबळे, सुनील पाटील, गणेश उपरे , नितीन पवार, राजू साळुंखे यांनी विशेष सहकार्य केले.