लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण संपन्न

0
1476
Google search engine
Google search engine
नाशिक :- उत्तम गिते-
१३कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत, जागतिक तापमान वाढ आणि वाढते प्रदुषण रोखण्यासाठी हातभार लागावा म्हणून सालाबादाप्रमाणे जिजामाता प्राथमिक  विद्यालयात हरीत सेनेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .विघालयाच्या प्रांगणामदे संस्थेच्या संचालिका सौ.पुष्पावती दरेकर व सो.निताताई पाटील  यांच्या शुभहस्ते गुलमोहर व इतर ११वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षरोपन केलेल्या वृक्षांना लगेचच संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या.
या प्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील ,निफाड पंचायत समिती सदस्या रंजनाताई   पाटील ,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील, मुख्याध्यापक अनिस काजी, कैलास भामरे,दिलीप शिरसाठ, हरीतसेना प्रमुख सुहास बच्छाव, समीर देवडे, राजाराम जाधव,केदुबाई गवळी, योगीराज महाले,बद्रीप्रसाद वाबळे,निफाड माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब वाजे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित व विद्यार्थी  होते.