लोकनेते व जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

0
2098
Google search engine
Google search engine
नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते 
महाराष्र्टातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो .आषाढी वारीचे औचित्य साधून लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळा अर्थात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला .या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणिच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले .यावेळी वारकरी वेशात टाळ,मृदुंग,वीणा,पताका,डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे विद्यार्थ्यांची ही वारी जणु पंढरपूरी निघाल्याचा प्रत्यय येत होता .दिंडी उत्साहाने झेंडा चौकातून पुन्हा विद्यालयात आणण्यात आली.यावेळी हातात भगवे पताके व मुलींनी डोक्यावर तुळस घेतली तर एन .सी.सी  च्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा ,झाडे जगवा,वृक्ष संवर्धनाचा संदेश मुलांनी तर बेटी बचावचा संदेश मुलींनी दिला .मुलगी वाचली तर देश वाचेल अशा भावना व्यक्त केल्या .पालखी गावप्रदक्षिणाकरीत विद्यालयात आल्यावर अभंग ,संतावरील भजणे व सत्संग म्हणाले ,त्याचप्रमाणे रिंगण तसेच फुगडी देखील विद्यार्थ्यांनी खेळली.यावेळी दिंडीचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर सचिव संजय पाटील,निफाड पंचायत समिती सदस्या रंजना पाटील ,निता पाटील, कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील लोकनेते विद्यालयाच्या प्राचार्या अनिता अहिरे,कन्या विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका लता जाधव ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी केले.दींडी यशस्वीतेसाठी दत्ता महाराज मरकड,एन .सी.सी.विभागप्रमुख प्रमोद पवार ,चंद्रकांत नेटारे,हेमंत नाईक , वसंत साबळे,श्रीहरी शिंदे ,आरती गायकर,बाळासाहेब झाल्टे,दशरथ पायमोडे,शारदा केदार,रेखा सपकाळ,रेश्मा वैष्णव,राजु पाटील यांनी परिश्रम घेतले .