पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्रात मुद्रालोन मार्गदर्शन महामेळावा संपन्न

0
1026
Google search engine
Google search engine

न्युज फ्लॅश:हेमंत व्यास-

सांगली जिल्ह्यातील कडेपूर ता. कडेगाव येथे भारतीय जनता पार्टी, 285 पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्र मुद्रा लोन मार्गदर्शन महा मेळावा पलूस – कडेगाव तालुक्यातील बेरोजगार व युवा व्यवसायीकांसाठी, शेती पूरक व्यवसाय (पोल्ट्री, पशुपालन, दुग्ध) व इतर व्यवसायीकांना मुद्रा लोन तत्परतेने मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन मेळावा *मा.पृथ्वीराज देशमुख (बाबा) अध्यक्ष, भाजपा सांगली जिल्हा* यांच्या मार्गदर्शनाखाली व *मा. संग्रामसिंह देशमुख (भाऊ) अध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यास मा. श्रीकांत मांडके (सर) यांनी मार्गदर्शन केले. मुद्रा लोन योजनेच्या जिल्हा स्तरीय कमिटी सदस्य पदी निवड झालेबद्दल मा. शंकरराव मोहिते, मा. राहुल शितोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. राजाराम गरुड सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश, सौ. मंदाताई करांडे, सभापती कडेगाव पंचायत समिती, सौ. सीमा मांगलेकर, सभापती पलूस पंचायत समिती, सौ. रेश्मा ताई साळुंखे, सदस्य जि. प. सांगली, अॅड. शांता कनुंजे, सदस्य जि. प. सांगली, मा. रविंद्र कांबळे, उपसभापती कडेगाव पंचायत समिती, सौ. मंगल ताई क्षिरसागर, सदस्या पंचायत समिती कडेगाव, मा. रविंद्र ठोंबरे, सदस्य पंचायत समिती कडेगाव, मा. आशिष घार्गे, सदस्य पंचायत समिती कडेगाव, इतर मान्यवर व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते..