नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पर्यावरण पूरक दिंडीचे आयोजन

0
1348
Google search engine
Google search engine
नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते :-

येथील नू.वि.प्र.मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढीनिमित्त प्रि प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांची दिंडी सर्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली
या दिंडीचे नियोजन संस्थेचे मार्गदर्शक जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले

आषाढी एकादशी निमित्त विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन व दिंडीचे नियोजन करण्यात आले होते,सर्व प्रथम आषाढी एकादशीचे महत्त्व शिक्षिका सौ जेजुरकर मॅडम यांनी विशद केले
पालखीचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हसमुखभाई पटेल व योगेश पाटील तसेच शिक्षिका सौ चित्रा व सौ.भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर व सदस्य चंद्रशेखर होळकर,सचिन मालपाणी मुख्याध्यापक सत्तार शेख,कार्यक्रम प्रमुख सौ सीमा पवार,उपमुख्याध्यापिका सौ माधवी सहाय,विभाग प्रमुख सौ जाधव,सौ वाधवा व सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

अनय विश्वंभर याने विठ्ठलाची तर कश्वी माठा हिने रुक्मिणीची भूमिका पार पाडली सर्व बाल वारकऱ्यांनी हाती भगवा झेंडा घेऊन व पारंपारिक वेशभूषेसह विठू नामाचा जयघोष करून दिंडीत सहभाग घेतला
या प्रसंगी बेटी बचाओ,पर्यावरण रक्षण,प्लास्टिक बंदी हुंडा बंदी इत्यादी विषयी जनजागृती करणारे फलक झळकावण्यात आले अभिनव.उपक्रमाचा भाग म्हणून शास्त्री नगर भागातील सर्व प्लास्टिकचा कचरा जमा करून लासलगाव ग्रामपंचायत ने उपलब्ध केलेल्या घंटा गाडीत संकलित करण्यात आला

दिंडीची सांगता पांडुरंगा चरणी भरघोस पाऊस पडावा म्हणून बाल वारकऱ्यांनी प्रार्थना केली
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ खापरे,सौ कापसे,सौ भावसार,सौ पटेल,सौ भारती पवार,सौ होळकर,कुमारी बकरे, कुमारी ठोंबरे,कुमारी जाधव आदींचे सहकार्य लाभले
शालेय व्यवस्थापन समितीने सर्व लहान वारकऱ्यांना केळी व बिस्किट प्लेट वाटप करून त्यांचा उत्साह वाढवला.