आंबेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एकनाथ आव्हाड

0
1212
Google search engine
Google search engine
नाशिक प्रतिनिधी (उत्तम गिते) 
येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी एकनाथ आव्हाड यांचा एकमेव अर्ज असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली.तसेच आंबेगावचे सरपंच विमल अशोक गिते यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलाविण्यात आली होती. त्याच प्रमाणे उपसरपंच पदासाठी एकनाथ आव्हाड यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचांनी त्याची उपसरपंच म्हणून  बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक दत्तात्रय दयफळे यांनी कामकाज पाहिले.
ग्रामसेवक यांनी एकनाथ आव्हाड यांची निवड झाल्याचे घोषित केले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री नितीन काळे, आनंदा भिमाजी गिते,भाऊसाहेब खंडू आव्हाड पूजा नाना सुराडे एकनाथ चंद्रभान आव्हाड उपस्थित होते.
या प्रसंगी निवडीचे कामकाज ग्रामसेवक दत्तात्रय दयफळे यांनी बघितले.या वेळी ग्रामपचायत माजी सरपंच सौ.विमल अशोक गिते माजी उपसरपंच जयश्री काळे , उत्तम गिते, सोमनाथ सांगळे,आनंदा गिते,पंडित आव्हाड,संजय आव्हाड, शिवाजी सोनवणे,लक्ष्मण आव्हाड,पुंडलिक सोनवणे ,मुरलीधर आव्हाड,नितीन काळे,आदी उपस्थित होते.
या वेळी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले व तसेच आभार माजी उपसरपंच जयश्री काळे यांनी मानले.