सातव्या वेतन आयोगाआधीच १९ लाख सरकारी कर्मचारी संपावर.

0
624
Google search engine
Google search engine

राज्यातले तब्बल १९ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी तीन दिवस संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार पूर्णपणे ठप्प होणार आहे. येत्या ७, ८ आणि ९ ऑगस्ट हे तीन दिवस सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणारआहेत. राज्यातल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ७२ संघटनांनी एकत्र येत संपाची ही हाक दिलीय. राज्य सरकारने मागण्या पूर्ण कराव्या म्हणून संघटनांनी सरकारला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती.मात्र, सरकारने त्याबाबत काहीच पावलं न उचलल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचं संघटनांचं म्हणणं आहे.

काय आहेत मागण्या…

सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटीकरण बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्या या संघटनांनी सरकारकडे केल्या होत्या.