क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह व लोकविद्यापीठ नव्या रूपात

0
1096
Google search engine
Google search engine
सांगली:न्युज फ्लॅश:हेमंत व्यास

सांगली जिल्ह्यातील कुंडल ( ता. पलूस ) येथील क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह व लोक विद्यापीठ याची पडझड झाली असून त्याचे बांधकाम व दुझस्ती करून त्यास पुनर्जिवित करण्यात येणार आहे .

स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देणारे प्रति सरकारच्या काळातील फिल्ड मार्शल स्व.क्रांतिअग्रणी जी डी बापुसो लाड यांच्या विचाराच्या संकल्पनेतुन निर्माण झालेले क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहाचे लोकविद्यापीठ आज पुनर्जीवित करणे गरजेचे आहे .जी डी बापुंनी शेणोली येथे आपल्या सहकार्यांच्या मदतीने इंग्रज कालीन आगगाडी अडवुन ती लुटुन त्या पैशाच्या माध्यमातुन गोरगरीब कष्टकरी रयतेसाठी जिवन दिशा निर्माण करण्यासाठी व शिक्षणाच्या माध्यमातुन बहुजन समाजातील घटकांना समाजामध्ये अस्मीता निर्माण करण्यासाठी शिक्षण रुपी अमृताचे बाळकडु पाजण्यासाठी हे वसतिगृह व लोकविद्यापीठ उभा केले . स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इंग्रजांशी निकराची झुंज देवुन त्यांना देशातुन हद्दपार करणारे क्रांति अग्रणी जी डी बापुसो लाड यांच्या क्रांति मय विचारातुन निर्माण झालेल्या या वस्तीगृहाच्या लोकविद्यापीठातुन अनेक विद्यार्थी आज विवीध क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करीत आहेत बापुंनी या विचाराच्या माध्यमातुन जुलमी राजकीय व्यवस्थेच्या परिवर्तनाचे स्वप्न बघीतले व ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले तेच कार्य करणेसाठी या लोकविद्यापीठातुन असंख्य जणांनी शिक्षण घेतले .पण दुर्दयवाने आज या वस्तीगृहाची पडझड झाली आहे पण हे वस्तीगृह पुनर्जिवित करण्यासाठी आदरणीय अरूण आण्णा लाड ,किरण तात्या लाड व शरद भाऊ लाड यांनी एकदिलाने प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी किरण तात्यांनी कुंडल येथे बैठक घेतली या बैठकीत द्राक्षबागायतदार मजुर शेतकरी परजिल्यातुन स्थायीक झालेल्या वर्गाने क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह व लोक विद्यापीठास उभे करण्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. यावेळी किरण तात्या लाड ,भिमराव आप्पा लाड ,सदाशिव माने, शामराव डुबल ,विजय दादा लाड, मारुती थोरबोले ,महेश मोरे, संतोष लाड, उत्तम पवार ,जयवंत माळी ,संजय लाड ,बाबासो ठोंबरे, समीर कुरेशी ,शंकर चोरमोले ,रमजान मुल्ला, यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थीत होते.