भजन हे भगवंताचे नामस्मरण करण्याचे प्रभावी माध्यम

0
945
Google search engine
Google search engine

नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांचे प्रतिपादन
कामगार भजन प्रशिक्षणाचे थाटात उद्घाटन

नितीन ढाकणे
:माणसाने मन शुद्धीसाठी भजन करावे. भजन हे भगवंताचे नामस्मरण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित चौदावे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


पैठण येथे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचे थाटात उद्घाटन झाले. यावेळेस पैठणेचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, पोलीस निरिक्षक चंदन इमले, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे, प्रविण महाराज गोसावी, विष्णु महाराज गायकवाड, बळीराम महाराज गोसावी, लेखाधिकारी नितीन निंभोरकर आदी उपस्थित होते . आध्यात्मिक कार्यातुन सकारात्मक उर्जा निर्माण होते. भजनामूळे माणूस सत्कर्म करतो असे यावेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे म्हणाले. राज्यभरातून मोठ्या संख्येने कामगार व कामगार कुटुंबीय भजन प्रशिक्षणात सहभागी झाले. चार दिवस चालणाऱ्या भजन प्रशिक्षण शिबीरात भजनबद्दलची माहीती कामगारांना तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भगवान जरारे, विनोद चव्हाण, अफरोज अहमद, रामनाथ ठेंगडे, जिज्ञेश पाटील, शमाकांत पाटील, जी. बी. पाटील, स्वप्नील परदेशी यांच्यासह कामगार मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन विजय अहिरे तर आभार दिनकर पाटील यांनी मानले.