बीड ५५ लाखांचा गुटखा जप्त, आता परळीतही आशा कारवाईची प्रतीक्षा!

0
789
Google search engine
Google search engine

बीड दरोडा प्रतिबंधक पथकाने ५५ लाखांचा गुटखा पकडला..

दोन दिवसात एकूण ८६ लाखांचा गुटखा जप्त
बीड नितीन ढाकणे, दिपक गित्ते

बीड : ट्रकमधून गुटखा औरंगाबादकडे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज सकाळी सापळा रचून सदर ट्रक पकडला. यावेळी ट्रकमधून तब्बल ५५ लाखांचा गुटखा पकडला. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गुटखा माफियांच्या प्रकाराने सर्वत्र खुले आम गुटखा मिळतो.

दरोडा प्रतिबंधक पथक बीड ग्रामीण हद्दीत गस्त घालत असताना १० वाजताच्या सुमारास सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना बीड बायपासवरून एका ट्रकमधून गुटखा औरंगाबादकडे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे जाधव यांनी सोबतच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने बायपासकडे धाव घेत रामनगर येथील एका चारचाकी वाहनाच्या शोरूमसमोर सापळा लावला. तेंव्हा १०.३० वाजताच्या सुमारास एक ट्रक (एमएच २४ जे ६२३७) बीडकडून गेवराईकडे जात असलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी ट्रक थांबवून आतील दोघांना पोलिसीखाक्या दाखवताच त्यांनी सोलापूरहून औरंगाबादकडे गोवा गुटखा घेऊन जात असल्याचे कबूल केले. झडती दरम्यान पोलिसांना ट्रकमध्ये तब्बल ४५ लाखांचा गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत गुटखा आणि ट्रक असा एकूण ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी बीड ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस कर्मचारी अभिमन्यू औताडे, भारत बंड, राजाभाऊ नागरगोजे, मुंजाबा सौंदरमल, राहुल शिंदे, महेश चव्हाण, हरिभाऊ बांगर, अंकुश दुधाळ, नारायण साबळे यांनी पार पाडली. काल बुधवारीचपोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ३१ लाखांचा गुटखा पकडला होता. त्यापाठोपाठ आजच्या मोठ्या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.