अकोट /प्रतिनीधी – शहर पोलिसांनी दि 09/09/18 रोजी पोळा व कर उत्सवा निमित्त अकोट शहराचा पूर्व इतिहास व संवेदनशीलता पाहता शहरात प्रभावी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराचे बातमी वरुन अकोला रोडवर श्रीहरी हॉटेल समोर नाकाबंदी केली असता काही वेळात अवैद्यरीत्या विना परवाना देशी दारु मोटारसायकल वर घेऊन जाताना 1) विजय उर्फ विक्की नागनाथ पउळ वय 30 वर्ष रा कमिटी फैल अकोट 2 ) सचिन कैलास बोरोडे वय 32 वर्ष रा हाडोळे प्लॉट नंदीपेठ अकोट यांना पकडून त्यांचे कडून देशी दारुचे 180 ml चे सीलबंद 192 क्वार्टर कि 11,520/- व एक मो सा हिरो होंडा डिलक्स एम एच 30 AL 3301 किंमत अ 25,000/- रु असा एकुण 36,520/- रुपयाचा माल जप्त केला वरुन त्यांच्या विरुध्द पो स्टे ला अप नं 320/18 कलम 65 ई म दा का प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच दि 08/09/18 रोजी प्राप्त माहिती नुसार श्रीराम नगर अकोट येथे 1) संगीता कुटे कडे प्रोव्ही रेड करुन त्यांचे कडुन देशी दारुचे 15 क्वार्टर की 900/- रु चा जप्त केला तसेच 2) गजानन बाळू वाघमारे यांचेवर प्रोव्ही रेड करुन देशी दारुचे 20 क्वार्टर की 1200/- रु चे जप्त केले त्यांचे वर 65 ई म प्रोव्ही ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल केले सदर कारवाही पो नि गजानन शेळके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकचे स पो नि ज्ञानोबा फड पोहेका संजय घायल नापोका राकेश राठी गोपाल अघडते पो का सुलतान पठाण विजय सोळंके यांनी केली