पोपटखेड धरण परीसरात फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह युवक पोलीसांच्या जाळ्यात

0
1225
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी – आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोपटखेड धरण जवळील अकोलखेड परीसरात पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान एका अल्पवयीन मुलीसह एक युवक फिरतांना मिळुन आला. आकोट ग्रामिण पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. 11. 9. 2018 रोजी डी.बी स्टाफचे ASI नारायण वाडेकर,ना.पो.का.गजानन भगत पो. कॉ.प्रवीण गवळी पो. कॉ.अनिल शिरसाठ हे पोपटखेड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोपटखेड धरण अकोलखेड परिसरात एक युवक व एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना दिसुन आले.त्यांना विचारपूस केली असता सदर युवकाने त्याचे नाव सत्यानंद वय (24)वर्षे राहणार नया अंदुरा तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला असे सांगितले दोघेजण घरून पळून आल्याचे सांगितल्याने त्यांना पोलिस स्टेशन अकोट ग्रामीण येथे आणून त्यांचे बाबत पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे विचारपूस केली असता पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे सदर प्रकरणात अपराध नंबर 287 /18 कलम 363,34 भादवी चा दिनांक 2 मे 2018 रोजी गुन्हा दाखल आहे. पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे संपर्क करून सदर युवक व अल्पवयीन मुलीला पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे अकोट पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे ,ए यस आय नारायण वाडेकर ना.पो.का. गजानन भगत पो.का.प्रवीण गवळी अनिल शिरसाट यांनी केली.