मध्यप्रदेश येथील युवकांनी केली वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या श्रमदानाच्या कामाची पाहणी ! उमठा गावाला भेट देऊन जाणून घेतल्या उपाय योजना !  मध्यप्रदेश मधील तिगाव येथे राबविणार हा उपक्रम !  पानी बचाओ मूहिम तिगाव द्वारे युवकांचा पुढाकार !

413
जाहिरात
मध्यप्रदेश येथील युवकांनी केली वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या श्रमदानाच्या कामाची पाहणी !
उमठा गावाला भेट देऊन जाणून घेतल्या उपाय योजना !
मध्यप्रदेश मधील तिगाव येथे राबविणार हा उपक्रम ! पानी बचाओ मूहिम तिगाव द्वारे युवकांचा पुढाकार !
विशेष प्रतिनिधी / सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून नरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली नरखेड तालुक्यातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली आणि नरखेड तालुक्यातील काही गावे आदर्श ठरली त्या आदर्श गावातील अनेक सामाजिक समस्यांचा आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मध्यप्रदेशातील तिगाव येथील युवकांना पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , व उमठा येथील भास्कर विघे यांनी जल बचाव मोहिमेची युवक मंडळी नीरज वानखडे , भुपेंद्र बेल , दिनेश हिवसे , नंदू गायकी , चेतन ठाकरे , गौरव बावनकर , शुभम ठाकरे , मंगेश भुते , किसना वानखडे , प्रीतम , या युवकांना नरखेड तालुक्यातील उमठा येथील वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या कामाचा आढावा सांगून मार्गदर्शन केले . देशातूनच नाही तर जगभरातून असंख्य लोक टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमांतून पाणी फाउंडेशन सोबत जोडले गेले. त्यानुसार अनेकांनी कामेही सुरू केली होती. अनेक स्तरांवर लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे बदल सुरू झाला, गोष्टी बदलू लागल्या. नरखेड तालुक्यातील उमठा येथील झालेल्या कामांमुळे कळत आहे की लोकांना परिवर्तन हवे आहे आणि त्यासाठी त्यांची काम करण्याची देखील इच्छा आहे हे नरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखवून दिले आहे .
पाणी ही एक अशी समस्या आहे जी सगळीकडे दिसून येते. गाव असो की शहर, पाण्याची समस्या सर्वत्र सारखीच आहे. येणाऱ्या काही दिवसात काय परिस्थिती असेल याचा विचार देखील करवत नाही. खासकरून गावात, कारण जिथे पाणी नाही तिथे शेती नाही. पाण्या अभावी शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो , पाणी टंचाईच्या या जीवघेण्या परिस्थितीला कंटाळून अनेकजण गाव सोडून शहराकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे .

त्यासाठी या सगळ्या गावांनी एकत्र येऊन आपल्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चात होणारे जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे . या कामाचा परिणाम म्हणजे त्यांच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे . या गावांवर पडलेल्या पावसाचा एकही थेंब वाहून जात नाही . पावसाच्या पाण्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने साठवून अडवून ठेवले गेले आहे .
हे काम प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात करता येण्यासारखे आहे. प्रत्येक गाव हिरवेगार व समृद्ध होऊ शकते कारण हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सोपे, शक्य आणि कमी खर्चात होणारे आहे .

पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ पाण्याच्या संकटाबाबत जनजागृतीच करत नाही तर ट्रेनिंगद्वारे तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे . पाणी फाउंडेशन ला हा विश्वास आहे की पाण्याच्या या संकटावर मात करण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी ताकद लोकांच्याच हातात आहे. कारण जिथे जिथे ही समस्या सोडवली गेली तिथे तिथे लोकांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असल्याचे जिवंत उदाहरण नरखेड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचाच आढावा घेऊन असा प्रयोग मध्यप्रदेश येथील तिगाव येथे करून आपले गाव ड्राय झोन मुक्त करून तिगाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी करून घेण्यासाठी आलेल्या तिगाव येथील युवकांना पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले व तिगाव येथील पाणी बचाव मोहिमेच्या युवकांनी उमठा गावाची प्रेरणा घेऊन पाणी फाउंडेशन च्या मार्गदर्शनामध्ये आपले गाव पाणीदार करण्याचा निर्धार केला व या कामाची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संकल्प त्या युवकांनी यावेळी केला .
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।